नाशिक- खरीप हंगामातील वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत झुआरी ॲग्रो केमिकल्स लिमिटेड या कंपनीच्या नावाने बनावट रासायनिक खतांची तस्करी होत असल्याचा प्रकार हरसूल (ता. त्र्यंबकेश्वर) येथे उघडकीस आला आहे. कृषी विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत अंदाजे साडेतीन लाखांचे बनावट खते आणि त्यांची वाहतूक करणारी आयशर गाडी मिळून सुमारे १५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.