Fall in Tomato Rates : दर घसरल्याने निघेना उत्पादन खर्च; शेतकरी हवालदिल

Tomato brought by farmers for auction in market committee.
Tomato brought by farmers for auction in market committee.esakal

पंचवटी : शेतकरी राजावर कधी आसमानी तर कधी सुलेमानी संकट येत राहतात. आजच्या घडीला टोमॅटो दरात होणारी घसरणीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बाजारभाव कमी मिळत असल्या कारणाने उत्पादन खर्चदेखील निघत नसल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली आहे.

नाशिक बाजार समितीच्या पेठ रोडवरील शरदचंद्रजी मार्केट यार्डात नाशिक, निफाड, सिन्नर, दिंडोरी, संगमनेर आदी भागातून टोमॅटोची आवक होत असते. सर्वसाधारण ऑगस्ट महिन्यात टोमॅटोची आवक सुरू झाली. सुरवातीस सर्वसाधारण दोनशे ते साडेतीनशे रुपये बाजारभाव मिळत होता. सप्टेंबर महिन्यात हाच बाजारभाव चारशे ते पाचशे रुपये होता. ऑक्टोबर महिन्यात टोमॅटोची लाली वाढली आहे.

बाजारभाव हे आठशे ते हजार रुपयांपर्यंत गेले होते. दिवाळीनंतर पावसाने उसंत घेतली. त्यामुळे आवक वाढली, परिणामी बाजारभाव कमी होत गेले. सोमवारी (ता.१४) जवळपास १०१५० जाळी आवक झाली. बाजारभाव पन्नास ते शंभर रुपये बाजारभाव मिळाला. टोमॅटोच्या बाजारभावात कमालीची घसरण झाली आहे. यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला असून, उत्पादन खर्च सुटत नसल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत आणखी भर पडत आहे.

Tomato brought by farmers for auction in market committee.
LPG Rates Hike : ग्रामीण भागात गॅसधारक पुन्हा चुलीकडे!

यामुळे दरात घसरण

नाशिकहून टोमॅटो हा मुंबई गुजरात, दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, बंगलोर आदी ठिकाणी जातो. दिवाळीनंतर या बाजारपेठेमध्ये स्थानिक टोमॅटोची आवक वाढली. यामुळे दरात घसरण झाली आहे.

"दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर खते, औषधी, पावडरचे दर या वर्षी वाढलेले होते. एकरी खर्चात वाढ झाली. तसेच पावसाने चांगलेच थोपटले, यात उत्पादन क्षमता कमी झाली. सद्यःस्थितीत दरात घसरण बघता या वर्षी उत्पादन खर्चदेखील निघणार नाही."

- दत्तात्रेय म्हैसधुणे, शेतकरी, मुंगसरा

"शेतकऱ्यास काही न काही संकटे सुरू असतात. सद्या टोमॅटोची आवक वाढल्याने दरात कमालीची घसरण झाली आहे. आजच्या घडीला शेतातील टोमॅटोचा खुडा करणारे शेतमजुरांची मजुरीदेखील निघणे अवघड झाले आहे." - संजय थेटे शेतकरी, गिरणारे

Tomato brought by farmers for auction in market committee.
Nashik : देवगिरी एक्सप्रेसमधून प्रवाशांचा धोकादायक प्रवास!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com