Family Communication : किशोरवयीनांशी कुटुंबात संवाद महत्त्वाचा!

शारीरिक-मानसिक-बौद्धिक-सामाजिक आकर्षणावर निघतो मार्ग
Family Communication
Family Communicationesakal

नाशिक : किशोरवयीन मुलांशी कुटुंबात संवाद महत्त्वाचा आहे. त्यातून शारीरिक-मानसिक-बौद्धिक-सामाजिक आकर्षणावर मार्ग निघतो. त्यासंबंधीची काळजी काही कुटुंबांमध्ये घेतली जातेय.

हीच स्थिती सर्रास कुटुंबांमधून राहिल्यास पौगंडावस्थेकडे निघालेल्या पिढीला निश्‍चित दिशा मिळू शकेल, असा विश्‍वास तज्ज्ञांना वाटत आहे. (Family communication with teenagers important nashik news)

कुटुंबात एकांगी राहणारी किशोरवयीन मुले सोशल मीडियाच्या आहारी जातात. त्यामुळे त्यांची मानसिक आणि शारीरिक घुसमट होते. मुले चिडचिडी बनतात. मानसिक संतुलन बिघडते. काही मुले गैरमार्गाला लागण्याची शक्यता बळावते.

ही सामाजिक समस्या अधिक गंभीर होण्यापूर्वीच तज्ज्ञ घरातील संवाद अधोरेखित करतात. खरे म्हणजे शरीरात बदल होतात. आकर्षण वाढते. इर्षा बळावते. किशोरवयीन संक्रमण हे पौगंडावस्थेपासून सुरू होऊन शारीरिक पूर्ण विकसित प्रौढत्वात संपते.

अर्थात, वयाच्या दहाव्या वर्षापासून ते विसाव्या वर्षापर्यंतची काळजी महत्त्वाची असते, तज्ज्ञ हे सातत्याने सांगत असतात. एकत्रित कुटुंब पद्धतीत बहुतांश घरात कुणाचे तरी आपल्या मुलांकडे जाणीवपूर्वक लक्ष राहायचे. जगण्याच्या तीव्र लढाईत चौकोनी, त्रिकोणी कुटुंबात व्यस्ततेतील जीवनातून मुलांकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची वेळ आता आली असल्याचे तज्ज्ञ सांगताहेत.

किशोरवयातील आकर्षण : परिस्थितीजन्य घटक

- समीपता : किशोरवयीन सहसा दूर राहणाऱ्यांपेक्षा जवळचे मित्र-मैत्रिणी निवडतात

- परिचितता : वारंवार संपर्कामुळे इतरांबद्दल आकर्षण निर्माण होते

- चिंता किंवा तणाव : अधिक चिंता अथवा तणाव असलेले एकटे राहणे पसंत करतात

वैयक्तिक घटक

- समानता : जे लोक त्यांच्या वृत्ती आणि वैशिष्ट्यांमध्ये आपल्यासारखे आहेत, त्यांच्याकडे अधिक आकर्षित होतात

- वैयक्तिक गुण : नकारात्मक तसेच सकारात्मक दोन्ही गुण असलेले लोक आवडतात आणि जे निर्दोष आहेत, ते जास्त आकर्षित होतात.

- आवडीचा परस्पर संवाद : जे आपल्याला आवडतात अथवा जे आपले मित्र आहेत, त्यांच्याकडे आकर्षित होतो

- शारीरिक आकर्षण : शारीरिकदृष्ट्या अधिक आकर्षक दिसणाऱ्यांचे आकर्षण असते.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Family Communication
Health-Fitness: पोलिसांनो, ‘डेडिकेशन’सोबत हवे ‘मेडिटेशन’

मानसिक आकर्षणे

(कल्पना, संकल्पना, विचार व भावना संपूर्ण आयुष्यावर परिणाम करतात)

- उच्च दर्जाचा मोबाईल, उत्तम कपडे, उत्तम बाइक

- नावीन्याची ओढ व नवनिर्मितीच्या इच्छेमुळे धाडसी क्रियेकडे आकर्षित होतात. (उदाहरणार्थ : जोरात गाडी चालवणे, डोंगर चढणे, पाण्यात उडी मारणे, हाणामारी करणे आदी.)

- नवीन गोष्टी करून बघण्याची, नवीन अनुभव घेण्याची व शोध घेण्याची तीव्र इच्छा असते. त्यामुळे धूम्रपान, मद्यपान, नशेचे पदार्थ, जुगार याकडे आकर्षित होतात.

- सतत प्रश्न पडतात व त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. गुगल, पोर्नोग्राफी, ऑनलाइन चॅटिंगकडे आकर्षित होतात.

- आदर्शवाद, निरनिराळ्या आदर्शवादी विचारसरणी, भव्य गोष्टी यांचेही आकर्षण असते.

- आदर्श व्यक्ती आणि त्याचबरोबर बंधने झुगारणाऱ्या, बंडखोर, वेगळ्या वाटेने चालणाऱ्या व्यक्तींबद्दल आकर्षण वाटते.

बौद्धिक आकर्षणे

- वैशिष्ट्यपूर्ण मानसिकता, विचारांची पद्धत व वागण्याची पद्धत हे बौद्धिक आकर्षणाचे परिणाम (उदाहरणार्थ : एखादा शोध, लेख लिहणे, निबंध लिहिणे, कविता करणे, चित्रकला, खेळ, वाद्य आदी.)

वैचारिक आकर्षणे

- योग्य व्यक्तींचा सहवास लाभल्यास चांगले संस्कार झाल्यास व योग्य मार्गदर्शन मिळाल्यास चांगली वैचारिक आकर्षणे दिसतात.

Family Communication
Health Mantra : या मंत्रांचा जप कराल तर सगळे आजार पळतील दूर, वाचा शास्त्र काय सांगतं

सामाजिक आकर्षणे

- स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. त्याची सुरवात स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करण्यापासून होते.

- स्वतःची ओळख बाह्य गोष्टींतून (कपडे, केसांचे वळण, आवडी-निवडी, फॅशन) व व्यक्तिमत्त्व विकासातून निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.

- आकर्षक दिसण्याचा व लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. इतरांना आधार अथवा मदत देतात व उपयोगी पडतात.

पालकांनो, हे आपण आवर्जून करावे

- संवाद : सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, सतत संवाद साधावा.

- जागरूकता : पाल्य काय करतात, कुठल्या संगतीत आहेत, अभ्यासाबद्दल जागरूक राहा

- स्पष्ट नियम आखा : काय करावे आणि काय करू नये, असे नियम करा व ते अमलात आणा

- आदर करा : आदराने वागा. लहान म्हणून त्यांना वारंवार दुखवू नका

- भावनिक जोड : भावनिकदृष्ट्या जोडले जाणे महत्त्वाचे आहे

"कौटुंबिक संवाद वाढवण्याची नितांत आवश्‍यकता आहे. त्यातून किशोरवयीन मुले-मुलींमध्ये वैचारिक भिन्नतेच्या प्रश्‍नावर मार्ग निघेल. त्यासाठी पालकांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. हे घडण्यातून सामाजिक समस्या निराकारणास हातभार लागू शकेल."

- डॉ. प्रशांत पुरंदरे (समुपदेशक)

Family Communication
 Health Tips : पोट साफ न होण्यास कारणीभूत ठरतात हे पदार्थ, आजपासूनच खाणं बंद करा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com