Latest Crime News | बोटॅनिकल गार्डन पाहणे पडले महागात! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime News : बोटॅनिकल गार्डन पाहणे पडले महागात!

नाशिक : पर्यटनानिमित्त आलेल्या ठाणे येथील एका कुटुंबीयांस बोटॅनिकल गार्डन बघणे चांगलेच महागात पडले. त्यांनी पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह मोबाईल, आयपॅड असा सुमारे ९१ हजाराचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी स्वप्नील विजय बोरसे (रा. ठाणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. (family from thane robbed for 91 thousand at Botanical garden Nashik Latest Crime News)

हेही वाचा: Nashik Crime: आरक्षित रेल्वे तिकीटांचा मोठा घोटाळा; १६ हजारांच्या तिकिटांसह तरुणाला अटक

बोरसे कुटुंबीय रविवारी (ता. ६) शहरात पर्यटनासाठी आले होते. दुपारी देवदर्शन आटोपून बोरसे कुटुंबीय परतीच्या प्रवासात पांडव लेणी भागात असलेल्या बोटॅनिकल गार्डन भागात गेले असता ही घटना घडली. महामार्गाच्या सर्व्हीस रोडवर (एमएच- ०४- केआर ६६७०) कार पार्क करून कुटुंबीय गार्डनमध्ये गेले असता चोरट्यांनी खिडकीची काच फोडून मागील पर्स चोरून त्यातील सोनसाखळी, अंगठ्या, ब्रेसलेट, मोबाईल, आयपॅड असा सुमारे ९१ हजाराचा ऐवज चोरून नेला.

हेही वाचा: Nashik Crime News : आजीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला; पोलिसांसमोर आव्हान