Latest MaratHi News | नाशिक : पंढरपूर वारीला गेले अन् बंगल्यात झाली घरफोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Burglary

नाशिक : पंढरपूर वारीला गेले अन् बंगल्यात झाली घरफोडी

नाशिक : पंढरपूर वारीसाठी गेलेल्या वृद्धाच्या बंद बंगल्याच्या किचनच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी घरातून ९७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेत जबरी घरफोडी केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

श्रीराम सोनार (रा. मातोश्री बंगला, वैभव कॉलनी, राजीवनगर) यांच्या फिर्यादीनुसार, ते गेल्या ४ जुलैपासून पंढरपूर येथे वारीसाठी गेले होते. १२ जुलैला ते वारीवरून परत आले असता, त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्यातील किचन रूमच्या खिडकीचे ग्रिल उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बंगल्याच्या बेडरूममधील कपाटातून सोन्याचे दागिने व रोकड असा ९७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. यात ४० हजार रुपयांची सोन्याचे मंगळसूत्र, ३० हजार रुपयांचे सोन्याची अंगठी आणि २७ हजार ५०० रुपयांची रोकड असा ऐवज आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिस उपनिरीक्षक बारेला या अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा: पुण्यात रिक्षावाल्यांकडून लूट, सैराटमधील सल्याला शिवीगाळ, मनस्ताप..

हेही वाचा: पावसाळ्यात नाश्त्यात गरम गरम हेल्दी शेंगोळे ट्राय करा, जाणून घ्या रेसिपी

Web Title: Family Went To Pandharpur Wari And Burglary In Home Nashik Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..