नाशिक: शेतकऱ्यांना एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी तत्काळ दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती राज्यातील वज्रमूठ-सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. पुढील दहा वर्षांत शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारे धोरण राज्य सरकारद्वारे राबविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.