
Nashik News : द्यानेत शेतकरी थोडक्यात बचावला!
नामपूर (जि. नाशिक) : द्याने ( ता. बागलाण ) येथील कांदा उत्पादक शेतकरी महेंद्र कापडणीस रविवारी (ता. २९ ) आपल्या शेतात कांदा पिकाला पाणी देत असताना अचानक विजेची मुख्य वायर तुटून शेतात पडली. (farmer closed saved in dyane from main electricity wire broke and fell in field nashik news)
हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल
परंतु सुदैवाने महेंद्र कापडणीस बाजूला असल्याने मोठा अनर्थ टळला. वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराची आपबिती सांगताना शेतकऱ्याचा थरकाप उडाला होता. शेतीसाठी वीजपुरवठा अनियमित, कमी अधिक दाबाने होत असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या आहेत.
शेतात असणारे वीजखांब, ट्रान्सफॉर्मर, विजेच्या तारा यांचे कोणतीही भाडे कंपनी देत नाही. विजेच्या तारेखाली असणारी शेती करायची की नाही असा प्रश्न पडला आहे. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याकामी तातडीने लक्ष घालून जीर्ण झालेल्या, लोंबकळणाऱ्या धोकादायक तारा तातडीने बदलाव्यात अशी मागणी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष शैलेंद्र कापडणीस यांनी केली आहे.