कसबे सुकेणे/ओझर: शेतकरी कर्जाच्या बोजाखाली दबला असून, व्याजाच्या ओझ्यामुळे आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचलेला शेतकरी आता आवाज उठवत आहे. याच पार्श्वभूमीवर स्वर्गीय शरद जोशीप्रणीत नाशिक जिल्हा शेतकरी संघटनेने आज मुंबईतील मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.