शिरपूर : शेतकरी मेळावा बातमी

शिरपूर : शेतकरी मेळावा बातमी
Published on: 
कृषी महाविद्यालयात उद्या शेतकरी मेळावा शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. २ : तरडी (ता. शिरपूर) येथील श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संचालित कृषी महाविद्यालयात शिरपूर सहकारी साखर कारखाना व माँ रेवा शुगर्स प्रा. लि. यांच्यातर्फे रविवारी (ता. ४) दुपारी दोनला बदलत्या हवामान परिस्थितीतील पर्यावरणपूरक ऊस शेती विषयावर शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार अमरिशभाई पटेल यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या जनसेवा उत्सवांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आमदार अमरिशभाई पटेल अध्यक्षस्थानी असणार आहेत. आमदार काशीराम पावरा, एसव्हीकेएमचे सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल, माँ-रेवा शुगर्सचे संचालक अंकित गोयल यांच्याहस्ते उद्‍घाटन होणार आहे. एसव्हीकेएमचे व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, कृषी महाविद्यालय प्रभारी योगेश भंडारी, बाजार समिती सभापती के. डी. पाटील, जि.प.चे माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, स्थानिक व्यवस्थापन सदस्य पद्माकर पाटील उपस्थित राहणार आहेत. पुणे येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या मृदा विज्ञान विभागाचे प्रकल्प समन्वयक डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके ‘बदलत्या हवामान परिस्थितीतील पर्यावरणपूरक ऊस शेती’ या मुख्य विषयांतर्गत बदलते हवामान, पाण्याचे व्यवस्थापन, जमिनीची सुपीकता, पर्यावरणपूरक शेती पद्धती याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. राजेंद्र देवरे, गणेश यादव, डॉ. आय. बी. चव्हाण यांनी संयोजन केले आहे. नोंदणीसाठी विश्वजित शेळके, डॉ. श्रीकांत लोहाळे, डॉ. नितीन मिसाळ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com