Nashik News: जमीन लिलावाविरोधात शिरसगावचा शेतकरी आक्रमक; स्वातंत्रदिनी कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा

Jaydev More
Jaydev Moreesakal

Nashik News : जिल्हा बँकेने एकतर्फी निर्णय घेत जमिनीचा लिलाव केल्याच्या विरोधात शिरसगाव (ता. निफाड) येथील शेतकऱ्याने आत्मदहनाचा इशारा दिला आहे. याबाबत सहाय्यक निबंधकांना निवेदन दिले आहे.

निवेदनाच्या प्रती विविध मंत्र्यांना पाठविल्यात आहेत. (Farmer of Shirasgaon aggressive against land auction Warning of self immolation with family on Independence Day Nashik News)

शिरसगाव येथील शेतकरी जयराम सुकदेव मोरे यांनी निवेदनात म्हटले आहे, की माझ्या कर्जाची फेड पूर्णपणे शेती उत्पन्नावरच अवलंबून आहे. मला शेतीशिवाय दुसरे कुठलेही उत्पन्नाचे साधन नाही. मला वृत्तपत्रामधील १ ऑगस्टला प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीच्या माध्यमातून लिलाव प्रक्रिया असल्याचे समजले.

त्यावर मी लेखी हरकत नोंदविली आहे. माझ्या हरकतीचा विचार न करता एकतर्फी जमीन विक्रीचा आदेश केला असून, तो मला मान्य नाही. मी शिरसगाव विविध कार्यकारी संस्थेकडून तीन लाखांचे कर्ज घेतले होते.

त्या कर्जाची व्याजासह १० लाख १० हजार ८०६ रुपये झाली आहे. व्याज व इतर अनुषंगिक खर्चाचा यात समावेश असून, त्यापैकी बरीचशी रक्कम भरली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jaydev More
Nashik Onion News: कांदा भले रेशनद्वारे वाटा; पण बाजारात नको! कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

विविध कार्यकारी सहकारी संस्था व नाशिक जिल्हा बँकेच्या विशेष वसुली अधिकाऱ्यांनी केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने मला मानसिक त्रास होईल, अशी जाचक दंडेलशाही वसुली गैरकायदा केली असून, त्यामुळे माझ्या कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे. दरम्यान, निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, आमदारांना देण्यात आल्या आहेत.

"नाशिक जिल्हा बँकेचे जिल्ह्यात अनेक थकबाकीदार शेतकरी असताना, माझ्याच जमिनीचा लिलाव करण्यात आला. ही लिलाव प्रक्रियाच बेकायदा व संगनमत करून बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी."

-जयराम मोरे, शेतकरी, शिरसगाव

Jaydev More
Jalgaon Rain Crisis: शेतकऱ्यांची कृत्रिम पावसासाठी याचना! कृती समितीचे मंत्र्यांना पत्र

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com