आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांसोबत भाऊबीज

आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांसोबत भाऊबीज
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी... --- फोटो क्रमांक : 35053 आंबोडे (ता. धुळे) : शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांसोबत भाऊबीज साजरी करत साडी-चोळीचा आहेर देऊन कुटुंबाचे सांत्वन करताना प्रा. डॉ. शरद पाटील. शेजारी पदाधिकारी, ग्रामस्थ. --- शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांसोबत भाऊबीज प्रा. शरद पाटील यांच्या सांत्वन यात्रेचे २१ वे वर्ष; ६४ आत्महत्यांची नोंद सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १५ : धुळे ग्रामीणचे माजी आमदार प्रा. डॉ. शरद पाटील यांच्या संकल्पनेतील शेतकरी आत्महत्या भाऊबीज सांत्वन यात्रा यंदा २१ व्या वर्षात झाली. ११ नोव्हेंबरला पार पडलेल्या या यात्रेत प्रा. डॉ. पाटील आणि सहकाऱ्यांनी गावोगावी जाऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांतील माता-भगिनींना साडी-चोळीचा आहेर देत त्यांचे सांत्वन केले. २००५ पासून जिल्ह्यात सुमारे एक हजार ४०० शेतकरी आत्महत्यांची नोंद आहे. नोव्हेंबर २०२५ ते ऑक्टोबर २०२६ या वर्षभरात जिल्ह्यात ६४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, त्यात धुळे तालुका (३३), शिंदखेडा (२०), साक्री (८) आणि शिरपूर (३) येथील शेतकऱ्यांचा समावेश आहे. पैकी २८ प्रकरणे पात्र, दहा अपात्र, २२ प्रलंबित, तर चार प्रकरणे गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेकडे वर्ग आहेत. यामध्ये एक महिला शेतकऱ्याचाही समावेश आहे. अपात्र प्रकरणांची फेरचौकशी करून प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अशी मागणी प्रा. डॉ. पाटील यांनी केली. एल-निनो आणि कोरड्या दुष्काळामुळे आगामी २५ महिने शेतकऱ्यांसाठी धोक्याचे असून, शेतकऱ्यांनी धीर धरावा आणि समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. या यात्रेत आंबोडे, बोरकुंड, नाणे, तरवाडे, सातरणे, ढाडरे आदी गावांतील कुटुंबांना भेटी देण्यात आल्या. या वेळी भय्या गर्दे, आबा मदने, बन्सीलाल माळी, खंडू गुरुजी, मनोहर अहिरे, प्रवीण गुरव, धर्मराज भदाणे, दीपक भदाणे, हिलाल गढरी, नरेंद्र जगताप, कल्याणसिंग राजपूत, बापू रावळ, नवलसिंग राजपूत, एकनाथ राजपूत, भगवान जगताप, अमोल राजपूत, भावसिंग राजपूत, प्रा. एस. एन. पाटील, विजय बोरसे, भावेश देवरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.