जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन

जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी.. ----- धुळे : मुख्य अंकातील विशेष पानासाठी.. -- फोटो क्रमांक : 31112 धुळे : शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई व कर्जमाफी मिळावी यासह अन्य मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांना देताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी. -- हेक्टरी एक लाख अनुदानासह कर्जमाफी द्या -- धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ३ : जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला असताना संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई व सरसकट कर्जमाफी मिळावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत करण्यात आली. आमदार रोहित पवार यांनी बुधवारी (ता. ३०) शिंदखेडा व धुळे तालुक्याचा दौरा करत थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केल्यानंतर गुरुवारी (ता. १) पक्षातर्फे निवेदन देत मागणी करण्यात आली. जिल्ह्यात अल्प पावसामुळे कपाशी, मका, तूर, बाजरी, कांदा, पपई, सोयाबीन व फळबागा जळून खाक झाल्या असून, पिके २५ टक्क्यांपेक्षा कमी हाती येणार आहेत. प्रशासनाचे पर्जन्यमानाचे आकडे सदोष असून, आणेवारी ५० पैशांपेक्षा कमी लावली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच वाडीशेवाडी धरणाच्या कॅनॉलची प्रलंबित नुकसानभरपाई द्यावी आणि गोंदूर येथील ‘अवाधा एनर्जी’कडून होणारी बळजबरी जमीन अधिग्रहण कारवाई थांबवावी, असेही निवेदनात नमूद आहे. २०१९ च्या आधीचे थकबाकीदार शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरावेत, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क १०० टक्के माफ व्हावे व वीजपुरवठा सुरळीत राहावा, मजुरांसाठी रोजगार हमीच्या उपाययोजना, जनावरांसाठी चारा अनुदान आणि रब्बी हंगामासाठी बियाणे-खते अनुदान स्वरूपात उपलब्ध करून द्यावीत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, किसान सभेचे प्रदेश उपाध्यक्ष सयाजी ठाकरे, किसन समिती जिल्हाध्यक्ष गुलाबराव पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गायत्री पाटील, शहराध्यक्ष नंदू यलमामे, कार्याध्यक्ष नितीन गावडे, युवक शहराध्यक्ष वाल्मीक मराठे, युवक जिल्हाध्यक्ष कुणाल पाटील, साक्री तालुकाध्यक्ष गिरीश नेरकर, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत पाटील, शिरपूर तालुकाध्यक्ष व्यंकटेश पाटील, शिरपूर विधानसभा क्षेत्रप्रमुख दिलीप पाटील, धुळे तालुकाध्यक्ष विनोद बच्छाव, रुबाब पिंजारी, शिंदखेडा तालुका कार्याध्यक्ष देविदास मोरे, विश्वासराव बेहेरे, अमीन शेख, दिलीप पवार आदी उपस्थित होते.
Marathi News Esakal
www.esakal.com