भाजीपाला, फळांच्या अल्प दराने शेतकरी हतबल

Farmer
FarmerSakal
Summary

सध्याच्या कोरोना परिणामामुळे शेतमालाला अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. कोरोना एकदाचा जावो अन् पुन्हा शेतमालाला चांगला भाव मिळो, अशा भावना शेतकरी कुटुंबातून व्यक्त होत आहेत.


भऊर (जि. नाशिक) : येथील गिरणा नदीखोऱ्यातील ऊस, डाळिंब, द्राक्षे या नगदी पिकांना बाय बाय करत येथील शेतकरी कोबी, टोमॅटो, कोथिंबीर, शिमला, खरबूज, कलिंगड आदी भाजी आणि फळपिकांकडे वळाला आहे. काही दिवसांत अर्थात कोरोना येण्यापूर्वी यातून भरघोस उत्पादन घेत आपली प्रगती साधली असली तरी सध्याच्या कोरोना परिणामामुळे शेतमालाला अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. कोरोना एकदाचा जावो अन् पुन्हा शेतमालाला चांगला भाव मिळो, अशा भावना शेतकरी कुटुंबातून व्यक्त होत आहेत. (Farmers are facing difficulties due to low prices of vegetables and fruits in markets)


अवकाळी पाऊस, गारपीट आणि बदलत्या हवामानामुळे कांदा, डाळिंब, ऊस, द्राक्षे आदी नगदी पिके घेणे अवघड जाऊ लागले. येथील शेतकरी डाळिंब पिकाची मोठ्या प्रमाणात शेती करीत होता; परंतु रोगांचे आक्रमण थोपविता न आल्याने डाळिंबाच्या बागा काढून टाकल्या. कांद्यातूनही चांगली उलाढाल होत असे. बदलत्या हवामानाचा फटका कांदा पिकाला बसत आहे. साखर कारखानदारी मोडीत निघाल्याने ऊस काढून टाकला. द्राक्षांचा खर्च परवडत नाही. यामुळे येथील शेतकरी आता भाजीपाला वर्गीय फळपिके घेऊ लागला आहे. त्यात खासकरून कोबी, टोमॅटो, शिमला मिरची, साधी तिखट मिरची, कलिंगड, गिलके, कारले, कोथिंबीर, कलिंगड, खरबूज, फ्लावर अशी पिके घेत आहे.

Farmer
तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नाशिक महापालिका सज्ज


या वर्षीही मोठ्या प्रमाणात टोमॅटोची लागवड करत खर्च केला आहे. पीक चांगले आले परंतु त्यात लॉकडाउन लागल्याने भाव पडले. टोमॅटोचे भाव प्रतिक्रेट पन्नास ते शंभर रुपयांवर येऊन ठेपल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. उत्पादन खर्चाचा विचार करता केलेला खर्चही भरून निघत नाही. अशीच गत शिमला मिरची, कलिंगड, खरबूज, कोथिंबीर आदी भाजीपाला पिकांची झाली आहे. व्यापारी फिरकले नसल्याने शेतकऱ्यांना स्वतः किरकोळ विक्री करावी लागत आहे. काही वर्षांपासून गुजरातमधील सुरत, बडोदा, अहमदाबाद तसेच मध्य प्रदेशातील काही व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर हा शेतमाल खरेदीकरिता येतात. यातून गावातील काही तरुणांना या व्यापाऱ्यांकडून कमिशन मिळते. पण यंदा व्यापाऱ्यांनी अल्प प्रतिसाद दिल्याने माल कमी किमतीत उचलला जात आहे. यामुळे येथील अनेक शेतकऱ्यांनी अशी पिके नांगरून टाकली.

भाजीपाल्याचे दर असे

  • टोमॅटो - ५ ते ७ रुपये किलो

  • कोथिंबीर - ५ रुपये जुडी

  • कलिंगड - ६ ते ८ रुपये किलो

  • खरबूज - ८ ते १० रुपये किलो

  • शिमला मिरची - १० ते १५ रुपये किलो

  • तिखट मिरची- १० ते १४ रुपये किलो


एक एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली होती. केलेला खर्च व निव्वळ नफा याची तुलना केली असता या वर्षी निराशाजनक स्थिती आहे. कोरोनामुळे सर्व बाजार समिती, मार्केट बंद असल्याने माल कवडीमोल द्यावा लागत आहे.
-सचिन पवार, भऊर, देवळा

रिपोर्ट - देवीदास पवार

(Farmers are facing difficulties due to low prices of vegetables and fruits in markets)

Farmer
नाशिकमध्ये आढळली तिसरी प्राचीन बुद्ध लेणी!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com