टुडे एकसाठी
CSG26B03027
पिलखोड (ता.चाळीसगाव) : येथील बाजार समितीत शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार मंगेश चव्हाण.
-----------------------------------------
शेतकरीहिताला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य
---
आमदार मंगेश चव्हाण : पिलखोड येथे मका, अन्नधान्य लिलावाचा शुभारंभ
सकाळ वृत्तसेवा
चाळीसगाव, ता. १७ : शेतकरीहिताला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. शेतकऱ्यांचा मुख्य बाजारात शेतमाल विक्रीसाठी येणारा वाहतूक खर्च व इतर आर्थिक भुर्दंड कमी व्हावा, या उद्देशाने स्थानिक पातळीवर हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. शेतकरीहिताचा हा महत्त्वपूर्ण निर्णय असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे, असे प्रतिपादन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.
चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील पिलखोड येथे अन्नधान्य संकलन केंद्राच्या नवीन हंगाम २०२६-२७ चा शुभारंभ आमदार चव्हाण यांच्या हस्ते शनिवारी (ता.१७) नारळ वाढवून करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी लिलाव प्रक्रियेचा अधिकृत प्रारंभही करण्यात आला. विशेष म्हणजे लिलावाच्या पहिल्याच दिवशी मक्याला २,३०० ते २,७११ रुपये प्रतिक्विंटल इतका समाधानकारक भाव मिळाला.
कांदा उपबाजार सुरू करणार
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बाजार समितीचे सभापती किशोर पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांची सोय हीच आमची प्राथमिकता आहे. पिलखोड परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता, आगामी काळात येथे कांदा उपबाजार सुरू करण्याचा बाजार समितीचा मानस आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना आपला कांदा विक्रीसाठी लांब जावे लागणार नाही.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला बाजार समितीचे उपसभापती राहुल पाटील, कपिल पाटील, बाजार समितीचे संचालक प्रभाकर जाधव, हेमराज बाविस्कर, शैलेश पाटील व विनोद घुमरे, पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन बाजार समितीचे सहसचिव सतीश पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी शशिकांत अडकमोल, भाऊसाहेब सोनवणे, अरुण शिरसाठ यांनी परिश्रम घेतले.