शिरपूर : कृषी उत्पन्न बाजार समितीचा इशारा

शिरपूर : कृषी उत्पन्न बाजार समितीचा इशारा
Published on: 
(पान ४ ला ॲंकर) के. डी. पाटील : SHC26B13507 ----------- विना परवाना शेतमाल खरेदी- विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करु सभापती के. डी. पाटील : शेतकऱ्यांना परवानाधारक व्यापाऱ्यांशी व्यवहार करण्याचे आवाहन सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. १७ : तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत असताना त्यांच्या शेतमालाची अनधिकृत खरेदी-विक्री करून फसवणूक करणाऱ्या दलाल, एजंट व व्यापाऱ्यांविरुद्ध शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने कठोर भूमिका घेतली असून, बाजार समितीचा परवाना न घेता शेतमालाची खरेदी- विक्री करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा समितीचे सभापती के. डी. पाटील यांनी दिला. शेतकऱ्यांच्या भाव आणि मापाबाबतच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीत अनौपचारिक बैठक घेण्यात आली. या बैठकीत विनापरवाना व्यवहार करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. श्री. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले असून, उपलब्ध शेतमालाला योग्य भाव मिळणे आणि वजनमापात शेतकऱ्यांची फसवणूक टाळणे आवश्यक आहे. मात्र, बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात काही विनापरवाना दलाल व व्यापारी थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधून शेतमालाची खरेदी- विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या व्यवहारांमध्ये शेतकर्‍यांची फसवणूक होण्याबरोबरच बाजार समितीचा महसूलही बुडत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम ६ (१) (ब) नुसार बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात शेतीमालाचे व्यवहार करण्यासाठी नियमानुसार अधिकृत परवाना घेणे बंधनकारक आहे. बाजार समितीच्या परिसरात अधिकृत मापाडी परवाना नसताना शेतमालाची मोजणी करण्याचे प्रकारही समोर आले आहेत. या प्रकारांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने समितीने या प्रकरणांची गंभीर दखल घेतली आहे. ----------- वजनमापांची खात्री करून घ्यावी शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून परवाना घेतलेल्या अधिकृत व्यापाऱ्यांकडूनच शेतमालाची खरेदी- विक्री करावी. व्यवहार करताना बाजार समितीची तकपट्टी, हिशोबपट्टी घ्यावी तसेच वजनमापांची खात्री करून घ्यावी, असे आवाहन समितीने केले आहे. यामुळे शेतमालाच्या दरात किंवा वजनात होणारी संभाव्य फसवणूक टाळता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com