महिला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सशक्तीकरणाचा’ उपक्रम

महिला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन  सशक्तीकरणाचा’ उपक्रम
Published on: 
शेतकऱ्यांच्या बांधावर लावला सेवा संकल्प अभियानात दीप पेठ : कृषी विभाग, जिल्हा परिषद, पेठ पंचायत समितीतर्फे झालेल्या ‘सेवा संकल्प अभियानात पेठ तालुक्यात ‘एक दिवस आशीर्वादाचा’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. बिरसामुंडा कृषी क्रांती योजनेच्या २०२५–२६ या वर्षातील लाभार्थी गांगोडबारी येथील महिला शेतकरी पार्वताबाई संपत गवळी यांच्या शेतावर गटविकास अधिकारी जे. टी. सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जाऊन ‘एक दिवस आशीर्वादाचा’ हा उपक्रमात कृषी अधिकारी संतोष राठोड यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दीप प्रज्वलन केले. पार्वता गवळी यांना नवीन विहिरीचा लाभ देऊन त्यांच्या शेतीतील उत्पन्न वाढविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. ‘सेवा संकल्प अभियानात कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन त्यांना विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी सुनिल बागूल , कृषी विस्तार अधिकारी जयवंत गारे , सचिन जाधव यांचेसह लाभार्थी शेतकरी उपस्थित होते. कोट नवीन विहिरीच्या लाभामुळे पाण्याचा कायमस्वरूपी साठा उपलब्ध झाल्याने आमचा शेती करण्याचा उत्साह वाढला असून, यापुढे कोरडवाहू शेती न करता संत्रा व फळबाग लागवड करण्याचा मानस आहे . -पार्वताबाई संपत गवळी ,गांगोडबारी ता. पेठ गांगोडबारी : शेतकऱ्यांच्या बांधावर दीप प्रज्वलन करतांना कृषी अधिकारी संतोष राठोड व शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com