धुळे शेती कर्जमुक्ती

धुळे शेती कर्जमुक्ती
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी, मेन -- धुळे जिल्ह्यातील २९१९ शेतकऱ्यांना दिलासा! - पालकमंत्री रावल : ‘कर्जमुक्ती‘ची तिसरी यादी जाहीर; आधार प्रमाणीकरण करावे सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १३ : कधी अवकाळी पाऊस, कधी दुष्काळ, तर कधी शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा स्थितीत डोक्यावरील थकीत कर्जाचे ओझे हलके होणे ही शेतकरी कुटुंबांसाठी दिलासादायक बाब आहे. याच दिशेने राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या योजनेच्या तिसऱ्या यादीत जिल्ह्यातील २,९१९ पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली. - ते म्हणाले, की योजनेंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली, ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीककर्जे तसेच पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि सुलभतेने व्हावी, यासाठी महाआयटीच्या माध्यमातून ऑनलाइन संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. राज्यातील बँकांनी एकूण ३१.१७ लाख थकीत कर्ज खात्यांची माहिती या प्रणालीवर अपलोड केली आहे. - शेतकरी याद्या प्रसिद्ध योजनेअंतर्गत नाशिक विभागातील तिसऱ्या यादीत एकूण १४ हजार २४४ शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यात धुळे जिल्ह्यातील २ हजार ९१९, नाशिक जिल्ह्यातील ३ हजार ८११, अहिल्यानगर जिल्ह्यातील ४ हजार ४१५, जळगाव जिल्ह्यातील १ हजार ७५६ आणि नंदुरबार जिल्ह्यातील १ हजार ३४३ शेतकऱ्यांचा समावेश आहे. आधार प्रमाणीकरण करताना वयोवृद्ध शेतकरी किंवा बोटांचे ठसे उमटत नसलेल्या लाभार्थ्यांना अडचणी येऊ नयेत, तसेच मृत पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची प्रक्रिया पूर्ण करता यावी, यासाठी शासनाने १९ ऑगस्ट २०२६ ला स्वतंत्र मानक कार्यप्रणाली निश्चित केली आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांच्या प्रकरणांमध्येही कर्जमुक्तीची कार्यवाही करता येणार आहे. - जिल्ह्यासाठी आवाहन धुळे जिल्ह्यातील तिसऱ्या यादीत समाविष्ट दोन हजार ९१९ शेतकऱ्यांनी आपले नाव संबंधित बँक, विकास संस्था किंवा ग्रामपंचायतीत तपासावे. कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणे महत्त्वाचे असून, कोणत्याही लाभार्थ्याने आवश्यक प्रक्रियेकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन पालकमंत्री रावल यांनी केले आहे. - १४-१ ...चौकट... १४-१ ...तर शेतकऱ्यांना लाभ पालकमंत्री रावल यांनी सांगितले, की पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँक शाखा, विकास संस्था आणि ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यादीतील शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची ३१ मार्च २०२६ ची थकबाकी तपासून जवळच्या आपले सेवा केंद्रावर आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. प्रमाणीकरण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात येणार आहे. या यादीतील शेतकऱ्यांचे १ एप्रिल २०२६ नंतरचे व्याज आणि इतर खर्चही माफ करण्यात येणार आहेत. तसेच राष्ट्रीयीकृत व व्यापारी बँकांमधील काही पात्र शेतकऱ्यांची ३१ मार्च २०२६ रोजीची थकबाकी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक असली, तरी शासनाच्या हेअरकट धोरणानुसार संबंधित संपूर्ण कर्ज निरंक करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com