(आवश्यक)
--------
NSK26H33984
मुंबई : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पीकविम्याबाबत मागणी करताना भाग्यश्री ठाकरे.
----
पीकविम्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ द्या
राष्ट्रवादी युवती काँग्रेसची कृषिमंत्र्यांकडे आग्रही मागणी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.३० : ऑनलाइन प्रणालीतील तांत्रिक त्रुटींमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खरीप पिकांच्या नोंदी खोळंबल्या आहेत. मुदतीत अर्ज न भरल्यास विम्याच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. ही समस्या तातडीने सोडवून पीकविमा अर्ज भरण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष भाग्यश्री ठाकरे यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची मंत्रालयात भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.
पीकविमा अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. ऑनलाइन प्रणालीत पीकपेरा नोंदी उपलब्ध नसल्यामुळे अनेक शेतकरी अद्याप खरीप पिकांची नोंदणी करू शकलेले नाहीत. त्यातच सेतू सुविधा केंद्रांवरही पीकविम्याचे अर्ज भरताना अडचणी येत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून होत आहेत.
महसूल आणि कृषी विभागामध्ये समन्वय साधून पीकपेरा नोंदी तातडीने अद्ययावत कराव्यात, ऑनलाइन प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात आणि शेतकऱ्यांना विनाअडथळा पीकविमा अर्ज भरता येईल, अशी व्यवस्था करावी. अर्ज भरण्यासाठी १५ दिवसांची मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
-------
चौकट
कृषी विभागाने तातडीने समन्वय साधावा
कृषिमंत्री भरणे यांनी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची समन्वय बैठक घेऊन पीकपेरा नोंदींची प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत. पीकविमा अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यासाठी यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे भाग्यश्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.
---