मालेगाव तालुक्यातील मोसम नदीवरील सर्व बंधारे पूर्ण भरून दुथडी वाहत असताना सदर बंधारा मात्र कोरडा झाला आहे. याबाबत सदर बंधाऱ्यावर पाणी अडवण्यासाठी चांगल्या प्रतीच्या मजबूत लाकडी फळ्या न बसवल्यास येत्या आठ दिवसात सटाणा कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पार्टीचे पदाधिकारी प्रवीण अहिरे, विठ्ठल महाजन, राजाराम पाटील, अरुण कोर, नथा कोर, शशिकांत कोर, हेमंत कोर, विनोद पाटील, महेंद्र कोर, सोपान मोराणकर, दिनेश शेवाळे, प्रल्हाद अहिरे, प्रशांत पवार, सुनील पवार आदींनी निवेदनाद्वारे दिला आहे. नामपूर- काकडगाव, मोराणे (ता. बागलाण) शिवारात मोसम नदीवर गटवर्षी सुमारे ४० लाख खर्चून बांधलेल्या कोल्हापुर टाईप बंधाऱ्यातील लाकडी फळ्या अज्ञातांनी चोरून नेल्याने पाण्याची साठवणूक होत नाही. याबाबत कोणतीही दखल न घेतल्यास आठ दिवसांनंतर सटाणा येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.