शेतकऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद

शेतकऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद
Published on: 
NSK26H34213 जळगाव : भरारी फाउंडेशनतर्फे आयोजित बियाणे व फराळवाटपप्रसंगी उपस्थित मान्यवर. शेतकऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद; भरारी फाउंडेशनतर्फे फराळवाटप सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १ : येथील भरारी फाउंडेशनतर्फे शेतकरी संवेदना अभियानांतर्गत जिल्ह्यातील अल्पभूधारक दुष्काळग्रस्त ४५ शेतकऱ्यांना बियाणे, खते व मिठाई, दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला. गेल्या १२ वर्षांपासून भरारी फाउंडेशन शेतकरी संवेदना अभियान राबविण्यात असून याचाच एक भाग म्हणून रविवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दुष्काळी परिस्थितीमुळे खचून न जाता पाणी कमी लागणाऱ्या पिकांचे उत्पादन घेण्याचे, महिला शेतकऱ्यांना गट शेती करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे शासनाच्या वतीने देखील खते व बियाणे उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले. तर आमदार सुरेश भोळे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या उपवर मुलींच्या विवाहासाठी सामूहिक विवाह कार्यक्रम आगामी काळात आयोजित करण्याचे आश्वासन याप्रसंगी दिले. शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त मिळालेल्या भेटीमुळे त्यांच्या व कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. उपक्रमासाठी रवींद्र फिरके, राहुल पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, भवरलाल ॲण्ड कांताई जैन फाउंडेशन, भाग्यश्री सीड्स, पद्मालम फार्मर प्रोड्यूसर कंपनी सपन झुनझुनवाला आदेश ललवाणी, विकास वाघ यांनी सहकार्य केले. दीपक परदेशी यांनी प्रास्तावित केले. अक्षय सोनवणे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी दीपक विधाते, सागर पगारिया, कैलास पटेल, रितेश लिमडा नंदकिशोर बारी, भूषण खांबायत, शुभम राजपूत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.