पान-२ सेकंडमेन
SNR26B22931
नायगाव ः महावितरणच्या कार्यालयाबाहेर शनिवारी धरणे आंदोलन करताना शेतकरी.
---------------
खंडित वीजप्रश्नी नायगावला आंदोलन
---------
वीजवितरणाच्या कार्यालयासमोर दोन तास शेतकऱ्यांचा ठिय्या
---------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.३ ः खंडीत वीज पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी नायगाव येथील वीज उपकेंद्राच्या कार्यालयासमोर शनिवारी (ता.३) सकाळी साडेनऊला धरणे आंदोलन केले. दिवसा आठ तास थ्रीफेज अखंडीत वीजपुरवठ्याच्या आश्वासनानंतर दोन तासांनी आंदोलन मागे घेण्यात आले.
---------------
पंचायत समितीचे माजी उपसभापती संग्राम कातकाडे, संदीप पानसरे, बबन लोहकरे, रोशन गायकवाड, संपत सांगळे, मंगेश कातकाडे, संजय जेजुरकर, ज्योत्स्ना पानसरे, अनिल बर्डे, नितीन बुरकूल, बंडू चव्हाण, केशव जेजुरकर, नवनाथ साठे, भगवान बोडके आदींसह शेतकरी सहभागी झाले होते.
महावितरणकडून काही दिवसांपासून खंडीत वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे पिके अडचणीत आली आहेत. दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना विहिरीतील पाणी पिकांना देण्याशिवाय पर्याय नसताना खंडित विजेमुळे ते देणे शक्य होत नाही. सोलर प्रकल्पासाठी शेतकरी, नागरिकांनी सहकार्य केले. त्यावेळी दिवसा बारा तास अखंडित वीजपुरवठ्याचे आश्वासन दिले होते. परंतु, दिवसाही खंडीत वीजपुरवठा केला जात असल्याने आश्वासनांची पूर्ती होत नसल्याबाबत संग्राम कातकाडे, संदीप पानसरे यांनी जाब विचारला.
१६-१
शेतकऱ्यांची प्रमुख मागणी
शाखा अभियंता योगेश गावले यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. त्यातच पुरेसे कर्मचारी नसल्याने सेवा चांगली मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली. रात्री सातत्याने वीजपुरवठा खंडीत होतो. त्यामुळे वस्तीवर राहणाऱ्या लोकांचे हाल होत आहेत. बिबट्याचा वावर असल्याने नागरिक अधिकच भितीयुक्त वातावरणात राहत आहेत. त्यामुळे थ्रीफेज वीज पुरवठ्यानंतर इतरवेळी टुफेज पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली. वीज पुरवठ्यातील त्रुटी दूर करण्यासाठी जुने कर्मचारी पुन्हा बोलावण्याची मागणी करण्यात आली.
१६-१
दोन तासानंतर आंदोलन मागे
शाखा अभियंता गावले यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी दिवसा आठ तास वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. इतर वेळीही वीजपुरवठा खंडीत होणार नाही असे आश्वासन दिले. इतर मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
--------------