इगतपुरी- तालुक्यातील शेतकऱ्यांची संकटाची मालिका अद्यापही सुरूच आहे. खरीप आणि रब्बी हंगामताही येथील शेतकऱ्यांवरील संकट दूर होत नाही. भात पिकाचे दुःख विसरत असतानाच रब्बी हंगामातील विविध पिकांच्या लागवडीपासून शेतकऱ्यांवर आपत्ती सुरू आहे. संकटातूनही कसेबसे सावरत आलेल्या पिकांवर आता अवकाळी पावसाचा शिडकावा अनेक पिकांना मारक ठरणार असून, पिकांच्या उत्पादनात घट आणि नगदी पिकांवर होणाऱ्या परिणामामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित चुकले आहे.