NDM26B01323
नांदूरमध्यमेश्वर ः धरणाच्या उजव्या कालव्याच्या नूतनीकरणाचे शेतकऱ्यांनी बंद पाडलेले काम.
-------------
३०-२
उजवा कालवा नूतनीकरणाचे
काम शेतकऱ्यांनी पाडले बंद
------------
सकाळ वृत्तसेवा
नांदुरमध्यमेश्वर, ता.१२ ः भीषण पाणीटंचाईच्या काळात पाटबंधारे विभागाने कालव्यात मातीचे भराव टाकल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याच्या निषेधार्थ रविवारी (ता. ११) म्हाळसाकोरे, खानगाव थडी, मांजरगाव, तामसवाडी, तारुखेडले व करंजी येथील शेतकऱ्यांनी खानगाव थडी येथे उजव्या कालव्यात उतरून नूतनीकरणाचे काम बंद पाडले.
नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या कालव्यांच्या रुंदीकरण व अस्तरीकरणाचे काम ठेकेदाराकडून सुरू आहे. ठेकेदाराने कालव्यात ठिकठिकाणी मातीचे भराव टाकल्याने धरणातून गळणारे पाणी अडवले गेले आहे. त्यामुळे जनावरांना पिण्यास पाणी मिळेनासे झाले आहे. कालव्यातील भराव तात्काळ हटवावेत, मशिनरी बाहेर काढावी आणि अस्तरीकरण बंद ठेवावे, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी उन्हात आंदोलन केले.
ठेकेदार कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक धीरज नाकतोडे यांनी भराव व मशिनरी हटवण्याचे आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनप्रसंगी खानगाव थडीचे सरपंच किरण दौड, शिवनाथ सोनवणे, शांताराम आव्हाड, दशरथ सांगळे, शरद बाजारे, रामदास सांगळे, फकिरा सांगळे, सुभाष आव्हाड, नंदू गिते, रामदास सोनवणे, पप्पू सोनवणे, सौरभ सांगळे, अमोल सोनवणे, प्रल्हाद सांगळे, यशवंत सोनवणे, वाळीबा सोनवणे, अजय फड, आकाश आव्हाड, ऋषिकेश चकोर, शिवाजी सांगळे, समाधान आव्हाड, नितीन सोनवणे, रवींद्र दौड, रोहित सांगळे, नितीन सांगळे, उत्तम दौड यांच्यासह खानगाव थडी, मांजरगाव, म्हाळसाकोरे, तारुखेडले, तामसवाडी, करंजी येथील शेतकरी उपस्थितीत होते.
----------
कोट
यंदा पाणीटंचाई गंभीर असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कालव्याचे काम पुढच्या वर्षी करावे, पण सध्या कालव्यात पाणी सोडून दिलासा द्यावा.
- शिवनाथ सोनवणे, शेतकरी, खानगाव थडी.