विनोद चंदन : मालेगाव कॅम्प- कसमादे भागातील नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्याचा मृत्यू झालेल्या कुटुंबीयांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना मोठी फायद्याची ठरली आहे. या योजनेंतर्गत मृत्युमुखी पडलेल्या तालुक्यातील ५७ शेतकरी वारसदारांना एक कोटी १४ लाख रुपयांची भरपाई मिळणार आहे.