NSK26H34856
जळगाव : मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११ हजारांचा धनादेश मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपविताना नगरसेवक अरविंद देशमुख.
-----
गिरीश महाजनांची साद,
अरविंद देशमुखांचा प्रतिसाद
उपशीर्षक
दुष्काळासाठी अकरा हजारांची मदत
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ९ : प्रतिनिधी शासनाकडून खात्यात जमा झालेल्या पाच हजार रुपयांच्या दुष्काळ मदतीत स्वतःचे ६ हजार १११ रुपये जोडून महापालिकेचे नगरसेवक अरविंद देशमुख यांनी ११ हजार १११ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सुपूर्द केला.
सध्या आपल्याला या मदतीची गरज नसल्याने अडचणीत असलेल्या दुसऱ्या शेतकरी बांधवाला हातभार लागावा, या भावनेतून आपण हा निर्णय घेतल्याचे देशमुख यांनी सांगितले.
आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या आणि सध्या मदतीची गरज नसलेल्या शेतकऱ्यांनी शासनाकडून मिळालेले पाच हजार रुपये स्वेच्छेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी द्यावेत, असे आवाहन महाजन यांनी केले होते. या वक्तव्यावर समाजमाध्यमांत टीका झाली होती. दरम्यान, महाजन यांना भेटण्यासाठी शेकडो शेतकरी आले होते. त्यांपैकी अनेकांनी निधीसाठी धनादेश सुपूर्द केल्याचे देशमुख यांनी सांगितले.
चौकट
सरकारवर शेतकऱ्यांनी
व्यक्त केला विश्वास
भेटीला आलेल्या काही शेतकऱ्यांनी महाजन यांच्या आवाहनाचे कौतुक केले. ज्यांना शक्य आहे त्यांनी स्वेच्छेने योगदान द्यावे आणि या निधीतून अडचणीत असलेल्या शेतकरी कुटुंबांना मदत मिळावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दुष्काळाचे संकट मोठे असले तरी त्यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार प्रयत्न करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
------