साक्रीत आमरण उपोषण

साक्रीत आमरण उपोषण
Published on: 
धुळे : टुडे पान ४ साठी... -- फोटो क्रमांक : 34363 साक्री : स्पायका शुगर मिलकडे असणाऱ्या थकीत ऊस बिलापोटी उपोषणास बसलेले धनंजय अहिरराव यांच्यासह शेतकरी. शेजारी विजय भोसले, वैभव सोनवणे, कन्हैयालाल माळी आदी. -- थकीत ऊस बिलापोटी साक्रीत बेमुदत उपोषण -- स्पायका शुगर मिलविरोधात शेतकरी आंदोलनात सहभागी सकाळ वृत्तसेवा साक्री, ता. ३ : रावळगाव (ता. मालेगाव) येथील स्पायका शुगर मिलकडे साक्री तालुक्यातील १४८ शेतकऱ्यांचे तीन कोटी ३७ लाख रुपये गेल्या ११ महिन्यांपासून थकीत आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही पैसे न मिळाल्याने सामाजिक कार्यकर्ते धनंजय अहिरराव यांनी बाधित शेतकऱ्यांसह दोन नोव्हेंबरपासून साक्री तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी नोव्हेंबरमध्ये कारखान्याला ऊस पुरवठा केला होता. मात्र, केवळ १० ते १५ शेतकऱ्यांनाच पहिला हप्ता मिळाला असून, उर्वरित सर्व शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मार्च २०२६ मध्ये झालेल्या आत्मदहन आंदोलनानंतर ३० एप्रिलपर्यंत बिल अदा करण्याचे आश्वासन मिळाले होते. परंतु, मुदत उलटूनही पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे धनंजय अहिरराव यांनी २८ ऑक्टोबरला मुख्यमंत्री, पालकमंत्री, साखर आयुक्त, जिल्हाधिकारी, सहकार मंत्री, तहसीलदार, पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले होते. त्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रतिक्विंटल दोन हजार ९०० रुपयांप्रमाणे संपूर्ण थकीत रक्कम अदा करण्याची मागणी केली होती. मागणी पूर्ण न झाल्याने धनंजय अहिरराव यांच्यासह लिंकेश अहिरराव, धर्मानंद सोनवणे, निवृत्ती सोनवणे, कमलसिंग राठोड उपोषणाला बसले आहेत. उपोषणाला मराठी पत्रकार समन्वय समितीचे अध्यक्ष विजय भोसले, ॲड. नरेंद्र मराठे, कन्हैयालाल माळी, संदीप बच्छाव, शिवसेनेचे किशोर वाघ, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक साळुंखे, प्रा. युवराज काकुस्ते, वैभव सोनवणे, अशोक पंडित सोनवणे आदी लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.