Kasamade Farming : ‘कसमादे’त गहू, हरभरा पीक काढणीला आला वेग

महागडी मजुरी देऊनही मजुर मिळत नसल्याने अनेक ठिकाणी शेतीच्या कामांचा खोळंबा होत आहे.
Kasamade Farming
Kasamade Farming sakal
Updated on

मालेगाव- तालुक्यासह कसमादेत रब्बी हंगामातील गहु, हरभरा ही पिके जोमात आहेत. गहु काढणीचे काम सुरु आहे. मजुर टंचाईमुळे यंत्राच्या साहाय्याने गव्हाची कापणी व काढणी केली जात आहे. वर्षभर घरासाठी लागणारा हरभरा लक्षात घेता काही शेतकऱ्यांनी हरभरा अल्प प्रमाणात लागवड केला आहे. कसमादेत सध्या मजुरांना सुगीचे दिवस आले आहेत. महिलांना अडीचशे ते तीनशे रुपये तर पुरुषांना चारशे ते पाचशे रुपये मजुरी द्यावी लागत आहे. महागडी मजुरी देऊनही मजुर मिळत नसल्याने अनेक ठिकाणी शेतीच्या कामांचा खोळंबा होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com