Unseasonal Rain : पावसाच्या शिडकाव्यामुळे बळीराजा हवालदिल; रब्बीतील पिकांवर संक्रांत

Cloudy weather in the taluka
Cloudy weather in the talukaesakal

इगतपुरी (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संकटांची मालिका अद्यापही सुरूच आहे. खरीप, रब्बी हंगामातही येथील शेतकऱ्यांवरील अस्मानी संकट हे पिच्छा सोडायला तयार नाही.

भात पिकांचे दुःख विसरत नाही तोच आता रब्बी हंगामातील विविध पिकांच्या लागवडीपासून शेतकऱ्यांवर आपत्ती सुरु आहे. संकटातूनही कसे बसे सावरत आलेल्या पिकांवर आता अवकाळी पावसाचा मारा अनेक पिकांना मारक ठरणार आहे. (farmers in trouble due to Unseasonal Rain showers Solstice on rabi crops nashik news)

मागील पंधरवड्यातही अवकाळी पावसाने तालुक्याच्या विविध भागात मारा केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यातच आज पश्चिम भागात झालेल्यामुळे शिकाव्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

अवकाळी पावसाने हंगामातील काकडी, मिरची, टोमॅटो, वांगी, गहु, हरभरा, मसुर आदी हातातोंडाशी आलेल्या पिकांचा घास हिरावण्याची शक्यता असून शेतकऱ्यांची संपूर्ण मेहनत वाया गेल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

Cloudy weather in the taluka
Nashik News: संदीप विद्यापीठाचा बेलारुशियन युनिव्हर्सिटीसोबत करार; आंतरराष्ट्रीय शिक्षणाची दारे खुली

इगतपुरी तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत असून यामुळे हातातोंडावर आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

"कष्टाने पिकविलेल्या पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान होत आहे.शेतकरी बांधवांना अगोदरच मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.शेतकरी बांधवांना शासनाने मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा आहे." - संतोष कोकणे, शेतकरी, त्रिंगलवाडी

"गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण व आजच्या शिडकाव्यामुळे नुकसान व यामुळे विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनी मोठ्या कष्टाने पिकवलेले व शेतात उभ्या असणाऱ्या पिकांना याचा फटका बसणार आहे."

- पांडुरंग धांडे, शेतकरी, पाडळी देशमुख

Cloudy weather in the taluka
State Excise Department : ‘एक्साईज’कडून महसुलात 80 टक्के उद्दिष्ट साध्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com