येवला- शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तुम्ही शेतकऱ्यांच्या समित्या नेमतात, कधी तरी एखादी समिती नेमून आजवरच्या जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाने कसे काम केले, बँकेचे कसे आर्थिक नुकसान झाले यावरही समिती नेमा अन कामकाजाचा शोध घ्या. अडचणीत आल्यावर शेतकरी गाऱ्हाणे माझ्याकडे घेऊन येतात, पण नाशिक जिल्हा बँक राज्यातील क्रमांक दोनची बँक असताना बँकेच्या आजच्या दुरवस्थेला जबाबदार कोण? असा प्रश्न मंत्री छगन भुजबळ यांनी शेतकरी शिष्टमंडळास केला. दरम्यान शेतकऱ्यांच्या व्याजमुक्तीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.