सिडको- अंबड, सातपूर, आडवण, पारदेवी व राजूर बहुला येथील शेतकऱ्यांच्या जमिनीचे एमआयडीसीकडून भूसंपादन करण्याच्या प्रक्रियेविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. ९ जुलैला चुंचाळे येथील पांजरपोळ संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. तरीही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास १४ जुलैला नाशिक ते मंत्रालय ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी दिला आहे.