पीकपेऱ्याचे अधिकार द्या

पीकपेऱ्याचे अधिकार द्या
Published on: 
(बातमी जागेनुसार कापता येईल) ‘तलाठ्यांना ऑफलाइन पीकपेऱ्याचे अधिकार द्या’ जळगाव, ता. १६ : शेतकऱ्यांनाच आपल्या पीक पेरणीचा अधिकार देण्यासंबंधी ई-पीक पाहणी उपक्रम सुरू आहे. पण अद्याप पिकपेरा लागवड ई-पीक पाहणीद्वारे होत नसल्याची स्थिती आहे. खरिपात या पीक पाहणीस कमी प्रतिसाद मिळाला. रब्बीत मात्र प्रतिसाद चांगला राहील, असे दिसत आहे. त्यात तलाठ्यांना ऑफलाइन पीक पेऱ्याचे अधिकार दिले जावेत, अशी मागणी केली जात आहे. सध्या केळी, मका, कलिंगड, कांदा, ज्वारी, हरभरा, गहू पेरणी व लागवड सुरू आहे. पूर्वहंगामी पीक लागवड पूर्ण झाली आहे. परंतु या लागवडीच्या नोंदी ऑनलाइन किंवा सातबाऱ्यावर दिसत नसल्याची स्थिती आहे. अद्ययावत प्रकारातील ॲण्ड्रॉइड मोबाईलच्या मदतीने ई पीक पाहणी अॅपवरून करावी लागते. रब्बी हंगामातील पीक पेऱ्यांबाबत अनेक शेतकऱ्यांना नोंदणी करायची आहे. परंतु ही नोंदणी करता येत नाही. शेतकरी पीक कर्ज व अन्य बाबींसाठी पिकपेरा लावलेला सातबारा उतारा देवू शकत नाहीत. नेटवर्क, डाटा हवा असतो. स्मार्ट फोन अनेकांकडे नाहीत. यामुळे पेरा नोंदणीस कमी प्रतिसाद मिळतो.या स्थितीत पीक पाहणी तलाठ्यांना करून देण्याचे अधिकार दिले जावेत, अशी मागणी कायम आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या मोबाइलमध्ये ॲप डाऊनलोड केले आहे. ॲप सांकेतांक नोंदणी केल्यावरही कार्यरत होत नाही, अशा तक्रारी आहेत. शेतकरी याबाबत तांत्रिक समस्या घेऊन तलााठी कार्यालयात जात आहेत. परंतु तलाठी याबाबत दुरुस्ती किंवा इतर कार्यवाहीबाबत असमर्थता दाखवीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.