पिंपळगाव बसवंत- पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटो विक्री करून चार महिने उलटले, तरी अडतदारांनी शेतकऱ्यांची अडीच कोटी रुपयांची देणी दिलेली नाही. संयम सुटलेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. ११) पिंपळगाव बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन छेडले. जोरदार घोषणाबाजी करत प्रवेशद्वार दणाणून सोडले.