वणी- जिल्हा मध्यवर्ती बँकेने सक्तीची कर्जवसुली व जमिनी जप्ती तत्काळ थांबवावी, अशा विविध मागण्यांसाठी दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी वनारे (ता. दिंडोरी) येथे अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करीत घेराव घातला. या वेळी शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले.