सिंचन विहिरींचे अनुदान रखडल्याने

सिंचन विहिरींचे अनुदान रखडल्याने
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी, अँकर --- लोगो छायाचित्र क्रमांक ः 35252 --- सिंचन विहिरींचे अनुदान रखडल्याने तालुक्यांतून तीव्र रोष जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांचा उपजिल्हाधिकाऱ्यांना घेराव; आर्वी गटातील गावे आक्रमक सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १७ : सिंचन विहीर योजनेअंतर्गत विहिरींची कामे पूर्ण करूनही तब्बल तीन ते चार वर्षांपासून शासकीय अनुदान मिळाले नसल्याने संतप्त झालेल्या शेतकरी वर्गाचा रोष मंगळवारी (ता. १७) उफाळून आला. जिल्हा परिषदेच्या आर्वी गटांतर्गत येणाऱ्या विविध गावांतील ३० ते ४० लाभार्थी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर यांना घेराव घातला. प्रलंबित अनुदानाबाबत जाब विचारत शेतकऱ्यांनी आपली आक्रमक भूमिका मांडली, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घोषणाबाजी केली. शासनाच्या सिंचन विहीर योजनेतून विहिरी मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांनी स्वतः बँकांकडून किंवा इतरांकडून कर्ज काढून विहिरींची कामे पूर्ण केली. मात्र, कामे पूर्ण होऊन तीन ते चार वर्षांचा कालावधी लोटला तरी अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही. एकीकडे दुष्काळी स्थितीमुळे शेतीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले आहे, तर दुसरीकडे विहीर खोदण्यासाठी घेतलेल्या कर्जाचे चक्रवाढ व्याज भरण्याचा नाहक आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडत आहे. यामुळे बळीराजा तीव्र आर्थिक संकटात सापडला आहे. चर्चेवेळी प्रश्नांचा भडिमार या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी उपजिल्हाधिकारी क्षीरसागर यांच्यासमोर प्रश्नांचा भडिमार केला. शासनाकडून निधी उपलब्ध होत नसल्याचे कारण वारंवार दिले जाते; मात्र काही मोजक्या लाभार्थ्यांना अनुदान मिळाले असताना, मागील तीन-चार वर्षांपासून कामे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना अद्याप निधी का मिळाला नाही, असा सवाल या वेळी उपस्थित करण्यात आला. सक्षम अधिकारी वेळेवर भेटत नाहीत आणि भेट झाली तरी ठोस आश्वासन किंवा उत्तर मिळत नसल्याबद्दल शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रलंबित अनुदानाचा प्रश्न तातडीने मार्गी लावून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर रकमा जमा कराव्यात, अशी ठाम मागणी करण्यात आली. पदाधिकाऱ्यांची उपस्थिती या आंदोलनाला संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नितीन जाधव आणि तालुका सचिव कैलास देसले यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. आर्वी येथील राजबाई पाटील, चंद्रकलाबाई घोरपडे, लक्ष्मीबाई पाटील, सुमतीलाल छोरीया, वंदनाबाई चौधरी, सुरेश शेंणगे, पुरमेपाडा येथील भिका देसले, दगा मराठे, रतन साळुंखे, मनीषा पगारे, बबलू मराठे, सोनेवाडी येथील गोरख शिंदे, बापू साबळे, सुरेश गवळी, कुळथे येथील रामदास धनगर, रामसिंग जाट, ललिता चव्हाण, तसेच बेंद्रेपाडा येथील शोभाबाई पाटील, संजय पाटील, वंदनाबाई निकम, राकेश देवरे, प्रतिभा पाटील, सुभाष पाटील यांच्यासह युवराज पाटील, पुंजाबाई पाटील, वत्सलाबाई पाटील, आशाबाई पाटील आदींसह अन्य शेतकरी उपस्थित होते. --- १४-१ कोट स्वखर्चाने आणि कर्ज काढून विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागत असल्याने यंत्रणेच्या आणि योजनेच्या अंमलबजावणीवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विहिरी खोदण्यासाठी अंगावर कर्ज घेतले. आता दुष्काळामुळे शेतीतून कवडीचेही उत्पन्न मिळत नाही आणि डोक्यावर कर्जाचे डोंगर व व्याजाचा भुर्दंड वाढत आहे. त्यामुळे आमचे रखडलेले अनुदान शासनाने तातडीने जमा करावे. - संतप्त शेतकरी, आर्वी गट, धुळे तालुका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.