‘50 खोके, मंत्री ओके’ भुसेंच्या विरोधात शेतकऱ्यांच्या घोषणा

Dada Bhuse news
Dada Bhuse newsesakal
Updated on

नाशिक : कासारे (जि. धुळे) येथे एकनाथ शिंदे सरकारमधील मंत्री दादा भुसे यांना शनिवारी (ता. ३) शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांनी भुसे यांना काळे झेंडे दाखवत संताप व्यक्त केला. तसेच भुसे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (Farmers slogans against Dada Bhuse nashik political Latest Marathi News)

Dada Bhuse news
Dhule Crime : प्रवेशबंदीतील सानपचा धुळ्यात पोलिसावर हल्ला

बंदरे व खनिकर्ममंत्री भुसे शनिवारी धुळे दौऱ्यावर होते. या वेळी कासारे (ता. साक्री) येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी ते जात असताना शेतकऱ्यांनी त्यांचा काळे झेंडे दाखवून निषेध केला. विशेष म्हणजे भुसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, शेतकऱ्यांनी त्यांना डावलत कांदा प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याची सूचना केली.

कांद्याला भाव मिळत नाही. साक्री तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर केला नाही. त्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते. या वेळी आंदोलकांनी ‘५० खोके, मंत्री ओके’ अशा घोषणाही दिल्या. पोलिसांनी आंदोलकांना बाजूला हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडत भुसे यांना दखल घेण्यास भाग पाडले.

दरम्यान, दादा भुसे यांनी शेतकऱ्यांची समजूत घालून त्यांचे म्हणणे ऐकण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक आंदोलक काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. मात्र, त्यांना मदत होताना दिसत नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. शिवाय, भुसे यांच्यासमोरच शेतकऱ्यांनी ‘५० खोके, मंत्री ओके,’ अशा घोषणा देत त्यांचा निषेध केला.

Dada Bhuse news
Nashik : पावसाच्या उसंतीनंतर देखावे बघण्यासाठी गर्दी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Yeola government clerk bribery news
Farmer’s Daughter Achieves CA Dream, Honors Late Father’s Wish
Suitcase Murder Case Cracked: Police Reveal Motive Behind Lover’s Killing
Nashik Water Scarcity
Marathi News Esakal
www.esakal.com