धुळे ः टुडे १ साठी
--
सौरऊर्जा प्रकल्पाचे काम रोखले
-
८० लाखांचे नुकसान; शेतकऱ्यांसह २४ जणांवर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १० : सोलर कपंनीत आमची शेती असलेली सांगून कंपनीचे ८० लाखांचे नुकसान करणाऱ्या शेतकऱ्यांसह २४ जणांवर निजामपूर (ता. साक्री) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
सालटेक (ता. साक्री) येथील गेल अॅण्ड टोर्नाडो सोलर कंपनीचा ७० मेगाबॅट क्षमतेचा सौरउर्जा प्रकल्प आहे. कंपनीमध्ये आमची शेती आहे. ती मोजून आम्हाला काढून द्या, अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी सोलर कंपनीचे मेन गेट बंद करुन तेथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तुम्ही येथून निघून जा, नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही. त्यावर कंपनीचे कार्यकारी प्रशासकीय अधिकारी मोहन नामदेव ब्राम्हणे (रा. डोमकानी, ता. साक्री) यांनी तुमची शेती असेल तर संबंधित विभागाकडून शासकीय मोजणी करून घ्या, असे शेतकऱ्यांना सांगितले.
ब्राह्मणे यांच्या सुचनेचा राग आल्याने शेतकऱ्यांनी कंपनीच्या तांत्रिक चमूला बंद इन्व्हेटर सुरू करू दिले नाही. त्यामुळे दोन लाख ११ हजार ९६३ युनिट वीजनिर्मिती झाली नाही. त्यातून कंपनीचे ८० लाख ४७ हजार ८५२ रुपयांचे नुकसान झाले. ब्राम्हणे यांच्या तक्रारीवरुन निजामपूर पोलिसांनी गोकुळ भिल, हिरामण भिल, मोहन भिल, पूनाबाई भिल, राजाराम भिल, शंकर भिल, शांतीलाल भिल, परशुराम भिल, पांडू भिल, बापू भिल (सर्व रा. जयश्री सोसायटी, पो. भामेर, ता. साक्री) यांच्यासह २४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.