जिल्ह्यात यंदा बारा शेतकरी आत्महत्या

जिल्ह्यात यंदा बारा शेतकरी आत्महत्या
Published on: 
जिल्ह्यात दहा महिन्यात बारा शेतकऱ्यांच्या आत्महत्या बागलाण तालुक्यात सर्वाधिक घटना सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २२ : जिल्ह्यात चालुवर्षी दुष्काळी परिस्थिती असताना दहा महिन्यात १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामध्ये बागलाण तालुक्यातील निम्मा घटनांची नोंद असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या माहितीतून समोर आले आहे. पावसाने पाठ फिरवल्याने यंदा जिल्ह्यात खरीप हंगाम पूर्णतः करपला आहे. राज्य सरकारने जिल्ह्यात १३ तालुक्यात दुष्काळ घोषित केला आहे. तसेच या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले आहे. मात्र, एकीकडे हे संकट दारावर येऊन उभे ठाकले असताना जिल्ह्यात यंदाच्या वर्षी १२ शेतकरी आत्महत्यांची नोंद जिल्हा प्रशासनाच्या दफ्तरी झाली आहे. जिल्ह्यात बागलाण तालुक्यात सर्वाधिक सहा शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. या व्यतिरिक्त कळवण व देवळ्यात प्रत्येकी दोन तसेच नाशिक आणि प्रत्येकी एक घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपैकी आठजणांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून मृत्यूला जवळ केले. तर प्रत्येकी एका घटनेत वैयक्तिक व नापिकाचे कारण समोर आले असून उर्वरित दोन प्रकरणात चौकशी करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. नऊ कुटुंबांना मदत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सरकारतर्फे एक लाख रुपयांची मदत केली. मागील दहा महिन्यातील १२ शेतकरी आत्महत्या प्रकरणी प्रशासनाने चौकशी करुन आत्महत्याग्रस्त ९ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत मंजूर केली. एक प्रकरण निकषात बसत नसल्याने मदत नाकारण्यात आली. दोन प्रकरणांमध्ये चौकशी सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आत्महत्या घटना बागलाण : ०६ कळवण : ०२ देवळा : ०२ नाशिक : ०१ पेठ : ०१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com