
कांदा साठवणुकीकडे शेतकऱ्यांचा कल; कमी भावाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
वडगाव (जि. नाशिक) : गाव व परिसरात यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची (Summer Onion) लागवड केलेली आहे. कांदा पिकावर अमाप खर्च झाला. त्यामुळे यंदा कांदा अमाप पिकला. सध्या मार्केटमध्ये कांद्याला ५०० ते ७०० रुपये प्रतिक्विंटल जवळपास भाव मिळत आहे. कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. मात्र भावाची घसरण झाल्याने कांदा पिकावर (Onion Crop) केलेला खर्चही निघायला तयार नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, त्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. (Farmers tendency towards onion storage because of low prices Nashik News)
यंदा कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर केली गेली कांद्याचे उत्पादन यंदा चांगले वाढले. भाव चांगला मिळेल. या शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरत असल्याचे दिसून येत आहे. कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे. भाव मिळत नसल्याने शेतीवरील केलेला खर्च देखील निघत नाही आहे. त्यात प्रचंड तापमानाचा फटका कांदा पिकाला बसून कांदा सडून व कांद्यावर पांढरे चट्टे पडले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना दिसत आहे. शेतांमध्ये बऱ्याच ठिकाणी कांदा काढणीच्या कामांचीही धामधूम सुरू आहे. कांदा चाळण करून व चांगला कांदा बाजूला काढून कांदा सुरक्षिततेसाठी व भाव वाढून मिळेल या आशेने शेतकरी कांदा चाळीत ठेवण्याची कामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना चांगल्या भावाची प्रतीक्षा आहे.
हेही वाचा: Nashik : ग्रीन मालेगाव ड्राईव्ह अंतर्गत 60 हजार झाडांची लागवड
लाल व उन्हाळी भगवा कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. शेतकरी काही रोप घरच्या शेतात घेतात व काही विकत घेतात. साडेतीन ते चार महिन्यात कांद्याचे पीक येते शेतात नांगरणी, बखरणी, शेणखत, रासायनिक खते पिकांवर फवारा तसेच निंदणी हा सर्व खर्च एकरी कांद्या पिकाला पन्नास ते साठ हजार एवढा खर्च येतो.
हेही वाचा: तरुणाची अनैतिक संबधातून हत्या; पोलिसांनी लावला 18 तासात छडा
"दहा एकर कांद्याची लागवड केली होती. बाजारपेठेत कांद्याला पाचशे ते सातशे भाव मिळत असल्याने कांद्यावरती जेवढा खर्च केला आहे. तेवढा देखील निघत नाही. त्यामुळे कांदा चाळीत साठवत आहेत."
- तानाजी ठोके, शेतकरी वडगाव.
Web Title: Farmers Tendency Towards Onion Storage Because Of Low Prices Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..