पंचवटी: शेतकरी हा कधी अस्मानी ते कधी सुलतानी संकटांनी नेहमीच घेरलेला असतो. मे महिन्यापासून सुरू असलेला पावसामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. गेल्या पाच दिवसांपासून संततधार सुरू आहे. यामुळे बाजार समितीच्या आवारातच विक्रीस आल्यानंतर चायना कोथिंबिरीला प्रतिजुडी एक ते दोन रुपये व डांगराला २५ रुपये किलो दर मिळाल्याने ते फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.