नामपूर- कांद्याचे २० टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी मालेगाव-ताहाराबाद रस्त्यालगत बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर बुधवारी (ता. १२) रास्ता रोको आंदोलन केले. ‘जय जवान, जय किसान’च्या घोषणांनी सारा परिसर दणाणला होता. जायखेड़ा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सागर काळे यांनी आंदोलकांची समजूत काढल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.