पान-४ मेन
SUG26B03140
सुरगाणा ः येथे नार- पार, गिरणा नदीजोड प्रकल्पास विरोध करण्यासाठी झालेल्या शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार नितीन पवार, समोर उपस्थित जनसमुदाय.
-------------------
बातमीत २ कॉ
SUG26B03135
सुरगाणा ः मेळाव्यापूर्वी काढण्यात आलेला मोर्चा.
--------------------
नार-पार, गिरणा नदी जोड प्रकल्पास विरोध
-------------
सुरगाण्यात आदिवासी एकवटले ः राजकीय नेत्यांमधील मतभिन्नतेमुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये नेतृत्वाबद्दल साशंकता
-------
सकाळ वृत्तसेवा
सुरगाणा, ता.२३ ः पश्चिम वाहिनी नार, पार, तान नद्यांचे वाहून जाणारे पाणी पूर्वेस गिरणा खोऱ्यात नदीजोड प्रकल्प राबवून पूर्वेकडे वळविण्याच्या योजनेला आदिवासी बांधवांनी जोरदार विरोध दर्शविला आहे. प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची एकमुखी मागणी प्रकल्पग्रस्तांनी सभेमध्ये करण्यात आली.
व्यासपीठावर आमदार नितीन पवार, माजी आमदार जे. पी. गावित, आदिवासी नेते चिंतामण गावित, मोहन गांगुर्डे, गोपाळ धूम, कॉंग्रेस नेते लकी जाधव, एन. डी. गावित, नवसू गायकवाड, विनायक गावित, प्रा. तुळशीराम खोटरे, सरपंच तुळशीराम महाले, राजेंद्र गावित, तुकाराम देशमुख, आनंदा झिरवाळ, भास्कर गावित, सीताराम पवार, सुरेश चौधरी, राजू पाटील, राजू पवार, विठ्ठल गावित, लक्ष्मण गायकवाड, देवकीबाई पवार, लता गायकवाड, जोतिंग बागूल, तुळशीराम गावित, दीपक मेघा, मधुकर खोटरे, मधुकर चोथवा, माधव पवार, सावळीराम पवार, भिका राठोड, धर्मेंद्र पगारिया आदी उपस्थित होते.
प्रकल्पास विरोधासाठी आदिवासी बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यामध्ये सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकप्रतिनिधी उपस्थिती होते. आमदार पवार म्हणाले,‘ अल निनोचा प्रभाव असल्याने पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस अत्यल्प होत आहे. त्यावर प्रभावी उपाय म्हणून पाणी साठवण बंधारे होणे गरजेचे आहे. मोठ्या प्रकल्पांना जनतेचा विरोध असेल तर माझा पण तीव्र विरोध आहे. या नद्यांवर के. टी. बंधारे, साखळी बंधारे, लघुसिंचनाच्या पूर्वी सर्वेक्षण करण्यात आलेल्या वांगण सु, मालगोंदा, सारणेआवण, सोनगीर, सतखांब, श्रीभुवन यासारख्या तेरा योजना झाल्या पाहिजेत, यासाठी लोकशाही मार्गाने लढा उभारल्यास रस्त्यावरच्या लढाईसाठी मी तुमच्या सोबत राहीन.’
१६-१
शेतीलाही पाणी मिळाले पाहिजे
माजी आमदार जे. पी. गावित म्हणाले,‘ संपूर्ण प्रकल्पास विरोध न करता प्रकल्पातील काही धरणांची उंची कमी करून कमीत कमी बाधित क्षेत्र, बुडीत क्षेत्र होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मात्र संपूर्ण प्रकल्पच रद्द झाला पाहिजे अशी भूमिका घेऊ नका. शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळाले पाहिजे. सर्वच धरणे रद्द करू नका. एकदमच धरणांना विरोध न करता योजनेत सुधारणा घडवून आणावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. धरणांची उंची कमी करून शेतीला पाणी मिळाले पाहिजे असे गावित यांनी सुचवले. मोहन गांगुर्डे यांनी म्हटले, आदिवासी समाज आता जागा झाला आहे. जमिनी बुडवून बेघर, निराधार करु नये. प्रकल्प रद्द केले पाहिजेत. लकी जाधव, योगेश ठाकरे, नवसू गायकवाड आदींनी भूमिका मांडली.
---------------------
२०-२ चौकट
आदिवासी बांधवांचा जनआक्रोष
- आजपर्यंत प्रकल्प आदिवासींच्या जमिनीवरच, म्हणून ते बेघर.
- मोठ्या प्रकल्पाऐवजी सतखांब, मालगोंदा, सोनगीर योजना राबवा
- स्थानिक शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यात यावे.
- प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन केले जात नसल्याचा आरोप
- धरणे झाल्यावर आपले काय होणार या भीतीने महिला आक्रमक
- काही लोकप्रतिनिधींची प्रकल्पास मूक संमती असल्याची चर्चा
- प्रकल्पाविरोधी सभास्थळी जोरदार घोषणाबाजी
---------------