जन्मदात्यानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमाला अटक | father molested own minor girl arrested Nashik Crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rape News

Nashik Crime: जन्मदात्यानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमाला अटक

Nashik Crime : पत्नी घरात नसल्याची संधी साधून संशयित नराधम बापाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक उपनगरातील कॅनाॅल राेड भागात घडली आहे.

याप्रकरणी उपनगर पोलिसात पाेक्साेसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (father molested own minor girl arrested Nashik Crime)

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

अल्पवयीन मुलीने आईच्या फिर्यादीनुसार, त्या खासगी नोकरी करीत असल्याने रात्रपाळी नोकरीनिमित्त घराबाहेर होत्या. ही संधी साधत या नराधमाने अल्पवयीन मुलीच्या एकटेपणाचा फायदा घेत १२ ते २० सप्टेंबर दरम्यान रात्रीच्या वेळी लैंगिक अत्याचार केले.

संशयिताचा अतिरेक वाढल्याने अल्पवयीन मुलीने हा प्रकार आईकडे कथन केल्याने तिने पतीविरोधात तक्रार दिली आहे.

त्यानुसार संशयित बापावर पाेक्साेसह अन्य कलमान्वये गुन्हा नाेंद झाला आहे. कॅनल रोडवरील आम्रपाली नगर भागात ही घटना घडली. पोलिसांनी संशयित बापास अटक केली असून तपास पोलिस निरीक्षक दुकळे करीत आहेत.