
नाशिक शहरात बाप-लेकाची आत्महत्या
म्हसरूळ (नाशिक) : पंचवटी भागातील सितागुंफा परिसरात राहणाऱ्या वडील आणि मुलाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरूदत्त कला व क्रीडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते जगदीश जाधव आणि प्रणव जाधव अशी मृत वडील-मुलाचे नाव आहे. गुरुवार (ता. १९) रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असता दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले होते. (Father-son suicide in Nashik city)
दोन दिवसांपूर्वी जगदीश जाधव यांचा वाढदिवस होता. यंदा त्यांनी तो एकदम साध्या पद्धतीने आणि कुटुंबीयांसोबत साजरा केला होता. मुलगा प्रणव हा महाविद्यालयीन विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. वडील आणि मुलाच्या सामूहिक आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, दोघांनी आत्महत्या का केली, आत्महत्या करण्यामागचे नेमकं कारण काय, या बाप -लेकाने इतके टोकाचे पाऊल का उचलले, असे अनेक प्रश्न पंचवटीकरांमधून उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नसून पंचवटी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा: लाच मागणाऱ्या हवालदाराला अटक; 23 दिवसांनंतर गुन्हा दाखल
हेही वाचा: नाशिक : म्हसरूळ परिसरात तरुणाचा खून
Web Title: Father Son Suicide In Nashik City News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..