सिन्नर- सरदवाडी मार्गावरील बसविलेल्या उंच गतिरोधकांमुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे. साचलेल्या पाण्याचा प्रवाह बदलून हे पाणी मॉडर्न कॉलनी, यशवंतनगरातील रस्त्यांवर साचून घरांमध्ये घुसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. सदोष गतिरोधकांबाबत चौकशी करून ते त्वरित काढून टाकण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.