FCI रस्त्याची दुरावस्था खड्‌ड्यांमुळे अपघातांमध्ये वाढ | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manmad Potholes on FCI road.

FCI रस्त्याची दुरावस्था खड्‌ड्यांमुळे अपघातांमध्ये वाढ

मनमाड (जि. नाशिक) : शहरातील महत्वाच्या असलेल्या एफसीआय रोडची दुर्दशा झाली असून, ठिकठिकाणी पडलेले खड्डे (Potholes), त्यामध्ये साचलेले पावसाचे पाणी आणि चिखल (Mud ) यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झालेले आहेत.

नुकतेच काम केलेले रस्ते अवघ्या महिना- दोन महिन्यात उखडून जात असल्याचे विदारक व चिंताजनक चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. (FCI road bad condition increase in accidents due to potholes nashik Latest Marathi News)

हेही वाचा: रावळगाव शिवारातील पांधन रस्त्यांची दुरावस्था

एफसीआयकडे जाणाऱ्या रस्त्याची देखील दुरावस्था झालेली आहे. पावसाच्या पाण्याने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये ठाण मांडलेले आहे. वाहनधारकांना ये-जा करताना पाणी व चिखलाचा सामना करावा लागत आहे.

स्वतःला आणि दुचाकीला सावरताना पाणी- चिखल टाळण्याची मोठी कसरत करावी लागत असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. गाडी ‘स्लिप’ होवून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मागच्याच वर्षी या रस्त्याचे काम करण्यात आले. मात्र, आता या रस्त्याची पुरती दुर्दशा झालेली आहे, असे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अपर्णा देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा: मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव; कीटकनाशक फवारणासाठी खर्चात वाढ

Web Title: Fci Road Bad Condition Increase In Accidents Due To Potholes Nashik Latest Marathi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..