Illegal Gutkha Factory
sakal
लखमापूर, वणी: राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू, पानमसाला, गुटखा, जर्दा, सिगारेट व तत्सम साहित्याचे तळेगाव (ता. दिंडोरी) येथील कारखान्यात बिनदिक्कत उत्पादन सुरू होते. नाशिकच्या अन्न व औषध प्रशासन भरारी पथकाने धाडसी कारवाई करीत या कारखान्यातून तब्बल नऊ कोटी सहा लाख २५ हजार ४२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राज्याच्या अन्न व औषध प्रशासनमंत्र्यांच्याच मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू बनविण्याचा कारखाना आढळल्याने पोलिसांना या कारखान्याबाबत काहीच माहिती नव्हती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.