FDA Crime : सटाण्यात गुटखा साठ्यावर अन्न व औषध प्रशासनाचे छापे; दोन सुपारी सेंटरमधून ८६ हजार ५२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त; पाच जणांविरुद्ध गुन्हे

सटाणा शहरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूच्या साठवणूक आणि विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करीत दोन सुपारी सेंटरवर टाकले छापे.
A team from the Food and Drug Administration conducts an inspection after raiding a shop in the city.

A team from the Food and Drug Administration conducts an inspection after raiding a shop in the city.

sakal

Updated on: 

सटाणा - शहरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूच्या साठवणूक आणि विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करीत दोन सुपारी सेंटरवर छापे टाकले. या कारवाईत ८६ हजार ५२२ रुपये किमतीचा प्रतिबंधित पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, पाच जणांविरुद्ध सटाणा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...