नाट्यगृहाची अनुभूती मिळते घरबसल्या!; नाशिकच्या कल्पेश कुलकर्णीची अनोखी चळवळ

chalo safar kare play scene
chalo safar kare play sceneesakal

गीताश्री पुराणिक : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ‘नाट्यगृहाची अनुभूती घरबसल्या’ ही स्वप्नरंजन वाटणारी ही अनोखी चळवळ नाशिकमधील तरुण कलावंत कल्पेश कुलकर्णी यांनी सुरू केली आहे. प्रायोगिक नाटकाकडील रसिकांचा कल वाढावा म्हणून कल्पेश सहा वर्षांपासून प्रयत्नशील आहे. कल्पेशने सहा वर्षात २५ प्रयोग केले असून, कोरोनाकाळात ही चळवळ थांबली होती.

५ सप्टेंबरपासून पुन्हा एकदा नाटकाची ‘तिसरी घंटा’ वाजली त्यानंतर त्यांनी दोन प्रयोग केले आहे. त्याच्या नाट्यगृह तुमच्या दारी उपक्रमात १५ कलावंतांचा संच सहभागी असतो. विशेष म्हणजे, प्रत्येक प्रयोगासाठी लागणाऱ्या खर्चासाठी कल्पेशचे आई- वडील मदत करतात. (Feel theater at home unique movement by Kalpesh Kulkarni of Nashik Latest Marathi News)

टेरेस अन् पार्किंग मध्येही प्रयोग

मायबाप रसिकांना नाटक कुठे पाहण्याचा आनंद मिळेल, याची माहिती घेतली जाते. सोसायटीचे टेरेस, पार्किंग, हॉल, उद्यानात, नाटकाचे प्रयोग सादर केले आहेत. कल्पेश म्हणाला, की प्रयोगांची रसिकांकडून भरभरून कौतुक झाले.

त्यामुळे आम्हाला ही चळवळ पुढे नेण्यात आनंद वाटतो. नाटक पाहिल्यावर नाट्यगृहात जाऊन आम्ही आता नाटक पाहणार आहोत, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया ऐकायला मिळते. प्रयोग सादर करण्याच्या आदल्या दिवशी जागेची पाहणी करतो. प्रयोगाच्या चार तास अगोदर आम्ही नाट्यगृहाप्रमाणे तयारी करतो.

chalo safar kare play scene
Nashik : डॉ. श्रीवास, डॉ. सैंदाणे यांचे अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर

‘चलो सफर करे’ नाटकाची निवड

प्रेक्षकांना नाट्यगृहाचा अनुभव घरच्या घरी मिळावा, नाटकातील सर्व अंकांची मेजवानी प्रेक्षकांना मिळावी. नाटक पाहताना आनंद मिळावा म्हणून कल्पेश कुलकर्णी याने ‘चलो सफर करे’ नाटक निवडले. नाटकाच्या प्रसंगात फॉग मशिनचा वापर करून सुंदर देखावा दाखवला जातो. यात लेखन, प्रकाशयोजना, नेपथ्य, संगीत व लाईट्स असे सारे वापरले जाते.

शांतनु चंद्रात्रेने नाटकाचे लेखन केले. पांडुरंगकर्मीचे दिग्दर्शन आहे. नेपथ्याची जबाबदारी ऋषिकेश पाटील, प्रकाश योजनेची जबाबदारी चैतन्य गायधनी सांभाळतो. नितीन पावरा व ललित श्रीवास्तव, वैष्णवी शेजवळकर आणि आयुष शिरसाटचे वादन, स्वरांजली गुंजाळची रंगभूषा आहे. या नाटकातील कलावंत ऋतुजा पाठक, कल्पेश कुलकर्णी, अनिकेत इनामदार, हनुमान जाधव, प्रद्युम्न शेवाळ, अमेय आचार्य हे आहे.

chalo safar kare play scene
‘वरी कोरडं आभाळ’ ला अनुजा देवरेचा स्वरसाज; ‘दार उघड बये’ मालिका शीर्षकगीत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com