Malegaon Bus Stand : मालेगाव बसस्थानकात रात्रीची सुरक्षा वाऱ्यावर

पुणे येथील बसस्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर बसस्थानकांमधील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला
Malegaon Bus Stand
Malegaon Bus Standsakal
Updated on

मुक्कामी आलेल्या काही बसेस आवारात तर काही यांत्रिकी विभागात उभ्या राहतात. बसेसच्या दरवाजाला लॉक लावले जात नाही. दोन्ही बस स्थानकातून

रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. येथे रात्री बाराच्या सुमारास नाशिक, नगर व धुळे येथे जाण्यासाठी शेवटची बस असते. मध्यरात्री बारा ते पहाटे पाचपर्यंत

बसस्थानकात शुकशुकाट असतो. विशेष म्हणजे दोन्ही बसस्थानकात रात्रीच्यावेळी नशाखोर, कुत्ता गोळी खाणारे व भिकारी झोपलेले असतात. यामुळे

अनेक प्रवाशांना त्यांच्या त्रासाचा सामना करावा लागतो.मालेगाव,- पुणे येथील बसस्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर बसस्थानकांमधील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. येथील नवीन व जुने अशा दोन्ही बसस्थानकांमधील महिलांसह प्रवाशांची रात्रीची सुरक्षा वाऱ्यावर आहे. विशेषत: जुन्या बस स्थानक आवारात रात्री चोरट्यांचा वावर असतो. प्रवाशांचे साहित्य, मोबाईल चोरीच्या घटना घडतात. नवीन बसस्थानकात सुरक्षा केबिन आहे. मात्र येथे पोलिस नसल्याने केबिन शोभेची वस्तू झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com