Crime
sakal
नाशिक, देवळाली कॅम्प: भाईगिरीच्या रील्स करणाऱ्यांना पोलिसांनी दणका दिला असतानाच, सोशल मीडियावर सोमवारी (ता.१३) आणखी एक रील्स व्हायरल झाली. परंतु यावेळी रील्स व्हायरल करणारे ‘भाई’ नव्हते, तर चक्क ‘ताई’ होत्या. गोदाघाटावरचे बॅकग्रांउड घेत गुन्हेगारीचे उदात्तीकरण आणि ‘ताईगिरी’ करणाऱ्या दोन्ही युवतींना पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. या ताईंनाही पोलिसांचा पाहुणचार मिळाल्याने, त्यांनीही ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ असा सूर लावत नाशिककरांची माफी मागितली.